खरचं साडी आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो.
नवऱ्याने पहिल्यांदा गिफ्ट केलेली साडी, आईची आठवण म्हणून जपून ठेवलेली साडी, तर कधी सासरच्यांनी आणलेली साडी असा विचार करून कितीतरी साड्या आपल्या कपाटात पडून असतात.
त्या साड्या आपण कोणाला देऊही शकत नसतो कारण त्यामध्ये आपल्या जवळच्या माणसांचे प्रेम आणि आठवणी आसतात.
पण आजच्या मॉर्डन जगामध्ये काही स्रियांना रोज साडी घालणं जमत नाही. म्हणून एक विचार मनात आलाय तो तुमच्याशी शेअर करत आहे.
आपण आपल्या साड्या पासून खूप छान छान ड्रेस बनवू शकतो.
छान ओढण्या बनवू शकतो .
आणि हो आवड असेल तर मार्ग ही सपडतोच बरोबर ना🤗